जालना, दि.12(जिमाका) :शालेय शिक्षण व क्रीडा विभागअंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने
राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने औद्योगिक
महाविद्यालय , जालना येथे राजमाता जिजाऊ व
स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचार्य श्रीमती. बकोले होते तर प्रमुख पाहुणे
जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,
प्रमुख वक्ते धंनजय पटिल व डॉ. सबनीस सर होते. श्रीमती लता लोंढे, श्रीमती
आरती चिल्लारे (क्रीडा अधिकारी ), राहुल गायके
यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमापूजनाने
करण्यात आली, सर्व मान्यवरांचे सत्कार
करण्यात आले.नंतर यावेळी क्रीडा अधिकारी
श्रीमती लता लोंढे यांनी आपल्या
भाषणातून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाची यथोगाथा व्यक्त केली. तसेच वक्ते धनंजय
पाटिल व डॉ. सबनीस यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यानंतर
श्री. नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी
यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे विचार आत्मसात करण्याचे
आवाहन केले. यावेळी शाळेतील सर्व
शिक्षक,शिक्षिका,शिक्षिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्रचार्या श्रीमती बकोले मॅडम
यांनी केल.
-*-*-*-*-*-*-

No comments:
Post a Comment