जालना,दि.27 (जिमाका): जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या
हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात विविध उपक्रम, योजनाचा
शुभारंभ व लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.
यामध्ये
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तंत्रज्ञान, पारदर्शक प्रशासन आणि पायाभूत सुविधांचा संगम
साधत जालना जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ आणि ‘भू-दृष्टी’
पोर्टलचा शुभारंभ जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला.
या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांमुळे ग्रामीण दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
तसेच
जिल्ह्यातील दिव्यांग, विद्यार्थी व वाचन संस्कृतीच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी
कार्यालय, जालना व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात
येणाऱ्या दिव्यांग सक्षमीकरण अभियान, प्रोजेक्ट व्हिजन तसेच ग्रंथालय प्रकल्प या तीन
महत्त्वपूर्ण प्रकल्पांवरील सामंजस्य कराराचे उद्घाटन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या
हस्ते यावेळी संपन्न झाले. तसेच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या
दिव्यांग सक्षमीकरण अभियान अंतर्गत 100 टक्के अंध दिव्यांगांना ‘NAVINAUT’ सहाय्यक
उपकरणांचे जिल्ह्यातील एकूण 100 दिव्यांगांना या संस्थेमार्फत ‘NAVINAUT’ किट वितरित
करण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात 7 जणांना ‘NAVINAUT’ किटचे
वितरण पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते
करण्यात आले.
केंद्र
शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना’ अंतर्गत नवीकरणीय ऊर्जेला चालना देण्यासाठी
जालना जिल्ह्यात 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 29 गावांमध्ये मॉडेल सोलार
स्पर्धेचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे
यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जालना फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने
जालना शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी विकसित करण्यात आलेले ‘माय जालना’ ॲपचे उद्घाटन
आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपमुळे जालना शहर महानगर
पालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता विषयक नागरिकांच्या समस्या दूर करण्यास हातभार लाभणार
आहे.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या
हस्ते प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण
करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना हार्वेस्टर व ट्रॅक्टरचे वितरण
करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 अंतर्गत निवडपत्रांचे वाटप करण्यात
आले. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान-2026 अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी,
कर्मचारी व नागरिकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी
खासदार कल्याण काळे, आमदार सर्वश्री राजेश राठोड, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण
कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी
अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी
शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
****
.jpeg)






.jpeg)
No comments:
Post a Comment