जालना, दि.22(जिमाका) : जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघटक /
कार्यकर्ता यांच्या कार्याचे मुल्यमापन होऊन त्यांचा यशोचित गौरव व्हावा या हेतूने
सन 2002-3 या वर्षापासून जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व
क्रीडा संघटक/कार्यकर्ता यांना शासनाच्या वतीने देण्यात येतो.जिल्हा क्रीडा गुणवंत
पूरस्कार सन 2024-25 चे घोषित केले असुन त्यांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कार सन 2024-25 तलवारबाजीसाठी जिल्हा गुणवंत
क्रीडा पुरस्कार (पुरुष) रोहन
लक्ष्मण वाघमारे, बुध्दीबळासाठी जिल्हा क्रीडा गुणवंत खेळाडू (दिव्यांग)
पुरस्कार आदित्य आसाराम घुले, सॉफ्टबॉसाठी जिल्हा क्रीडा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक
पुरस्कार एकनाथ बाळाजी सुराशे हे आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या
क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवकांनी पार पाडलेल्या भुमिका, दिलेले योगदान युवकांची
एक अद्वितीय समुह अशी ओळख समाजात झालेली आहे. राज्यातील युवांनी केलेल्या समाजहीत च्या
कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे
यासाठी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार देण्यात
येतो.जिल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 साठी जिल्हा युवा पुरस्कार (युवती ) करुणा अच्युत
मोरे व जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) स्वामी विवेकानंद आश्रम किन्होळा ता. बदनापुर
जि. जालना यांना देण्यात आले आला आहे. अशी माहिती
जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment