Monday, 19 January 2026

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात

 



 जालना, दि.19 (जिमाका) : महिला व बाल विकास विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी बालगृहामधील अनाथ, निराश्रीत आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी दि. 19 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालयाचे मैदानावर तीन दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हयाचे अपर पोलीस अधिक्षक मा. श्री आयुष नोपाणी सर, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव बंडकर एन. एम. सर यांचे हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून आणि आकाशात तिरंगी व बहुरंगी फुगे सोडून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी केले. उदघाटन प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक नोपाणी सर आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव मा. बंडकर सर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत आणि सदस्या विद्या लंके यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

बाल महोत्सव म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही तर बालकांच्या सुप्त कला गुणांना वाव देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी उपलब्ध करून दिलेले एक व्यासपिठ आहे. सदरील बाल महोत्सवामध्ये कब्बडी, 100 मी. धावणे, गोळा फेक, थाळी फेक, लिंबु चमचा रेस, पोत्यामधून चालणे इत्यादी मैदानी खेळ आणि कॅरम, बुध्दीबळ, चित्रकला, निबंधस्पर्धा या सारखे इनडोअर गेम तसेच एकल व समुह गायन, एकल व समुह नृत्य, वक्तृत्व स्पर्धा या सारखे सांस्कृतीक कार्यक्रम असे भरघोस कार्यक्रम घेवून तिन दिवस मुलांना त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मा. अपर पोलीस अधिक्षक श्री नोपाणी सर म्हणालेकी, मुलांनी अभ्यासा सोबतच खुप खेळले पाहिजे खेळ हा फक्त जिंकण्यासाठीच नाही तर खुप मौजमस्ती करण्यासाठी खेळला पाहिजे. तसेच पोलीस विभागा मार्फत सदर कार्यक्रमासाठी पोलीस मैदान तर उपलब्ध करून दिले आहे आणिखी काही आवश्यकता असेल तर ते सांगावी असेही ते म्हणाले. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री बंडकर सर यांनी ही मुलांना मुलांना खेळ किती महत्वाचा आहे या बाबत मार्गदर्शन केले. तसेच मुलाच्या मैदानी खेळास हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करून दिली. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment