Monday, 19 January 2026

‘हिंद दी चादर’निमित्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठक संपन्न · श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन

 



 

जालना, दि.19(जिमाका) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील भाविकांना नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. या महासोहळ्यात शीख, सिकलीगर, बंजारा,लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाज आदी समाजासह इतर समाजातील सुमारे 9 ते 10 लाख भाविक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमास विविध सामाजिक संस्था, आणि सीएसआरच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातून शक्य तेवढी मदत पोहचविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि समाज घटकांमार्फत करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत श्रीमती मित्तल बोलत होत्या. यावेळी बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल, शिक्षणाधिकारी बी. आर. खरात, जिल्हा समाज कल्याण अधिकारी लिंबाजी बारगिरे, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, मनोज उकिर्डे, ॲङ विनोद राठोड, श्री. कमलेशजी, उद्धव पवार, गुरविंदर सिंग, गुरुदिप सिंग बंड, रण सिंग संधू, गणेश राठोड, अर्जून राठोड, श्रीकांत राठोड, राजेश जांगडे, हितेश जोशी  यांची उपस्थिती होती.

श्री गुरू तेग बहादूर जी  यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे दि. 24 व 25 जानेवारी रोजी आयोजित ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमास देश-विदेशातील जास्तीत-जास्त भाविकांना उपस्थित राहाता यावे यासाठी विशेष रेल्वे आणि बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे.

 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment