Tuesday, 13 January 2026

जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर

 


 

        जालना दि. 13 (जिमाका) :- धार्मिक सण उत्सवानिमित्त जिल्ह्यातील तीन सार्वजनिक सुट्ट्या जिल्हाधिकारी यांना जाहिर करण्याचे अधिकार आहेत. त्यानूसार जालना जिल्ह्यासाठी शुक्रवार दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन, दिपावली सणानिमित्त सोमवार दि.9 नोव्हेंबर 2026 आणि दि. 16 डिसेंबर 2026 रोजी राजाबाग सवार दर्गा उत्सवानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. ही अधिसुचना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल  यांनी जारी केली आहे.  स्थानिक सुट्ट्या जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेची कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थाना लागू राहतील. तर जालना जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू होणार नाहीत. असेही अधिसुचनेत नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment