जालना, दि.21(जिमाका) : जिल्ह्यातील बदनापूर व परतुर या दोन तालुक्यांचा
समावेश आकांक्षित तालुका योजना राबविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना श्रीमती
पी. एम.मिन्नू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत तालुकास्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांचा सविस्तर
आढावा घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुचित
कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती संगीता भागवत, गटविकास अधिकारी परतुर गटविकास
अधिकारी बदनापूर श्रीमती ज्योती राठोड, गटशिक्षणाधिकारी परतुर भरत वानखेडे, बदनापूर
क्षिरसागर, यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती पी. एम. मिन्नू यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून
निश्चित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या
योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचला पाहिजे, यावर विशेष भर देण्यात आला. आकांक्षित तालुक्यातील
शाळा व अंगणवाड्यामध्ये प्राधान्याने मुलां-मुलींसाठी शौचालयाची कामे पूर्ण करावीत.
तसेच सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी देखील शौचालय स्वच्छता
व कामे पूर्ण करणेबाबत निर्देश दिले.
बैठकीत आरोग्य, पोषण, शिक्षण,
कृषी, पिण्याचे पाणी, स्वच्छता, महिला व बालकल्याण तसेच सामाजिक-आर्थिक विकासाशी संबंधित
निर्देशांकांवर चर्चा करण्यात आली. आकांक्षित तालुक्यांमधील कामकाजाची सद्यस्थिती,
प्रगती अहवाल, तसेच अद्याप प्रलंबित असलेल्या कामांबाबत संबंधित विभाग प्रमुखांकडून
माहिती घेण्यात आली.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment