जालना, दि.25 (जिमाका) : पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री
पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नियोजन भवन येथे दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे
आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये
दि. 14 जुन 2025 रोजी संपन्न झालेल्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे. दि. 14 जुन
2025 रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातील
मुद्द्यांचे अनुपालन अहवाल. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनु. जाती
उपयोजना/ओ.टी.एस.पी.) सन 2025-26 खर्चाचा आढावा घेणे.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनु.
जाती उपयोजना/ओ.टी.एस.पी.) सन 2026-27 प्रारुप आराखड्यास मान्यता देणे.जिल्हा वार्षिक
योजना (सर्वसाधारण/अनु. जाती उपयोजना/ओ.टी.एस.पी.) सन 2025-26 पुनर्विनियोजनास मान्यता
देणे. अध्यक्ष महोदयांच्या मान्यतेने सुचविलेले ऐन वेळेचे विषय याबाबत चर्चा करण्यात
येणार आहे. तसेच बैठक संपल्यानंतर पालकमंत्री पत्रकार परिषद घेणार आहे. अशी माहिती
जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-*-*-

No comments:
Post a Comment