जालना,दि.30(जिमाका) : जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव मनिषा देशपांडे, पोलीस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे, कृषी उपसंचालक एस.एच. कायंदे, अन्न व औषध सहा. आयुक्त निखील कुलकर्णी, वैधमापनचे आर.डी. दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अनिल कदम, महावितरणचे चेतन पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे यांच्यासह अशासकीय सदस्यांची बैठकीस उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, नागरिकांना दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणी किंवा समस्यांबाबत उपाय योजना करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आहे. याकरीता जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमातून ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहीमद्वारे प्रयत्न करावा. ग्राहकांना काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात,
यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीमध्ये विविध विषयाच्या तक्रारी मांडल्या यामध्ये जिल्ह्यातील काही भागातील औषधी दूकानदार हे काही निवडक डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्श्न असेल तरच औषधी देतात. तसेच शहर व ग्रामीण भागत अनधिकृत वैद्यकीय व्यावसायीक (बोगस डॉक्टर) असल्याची तक्रारी आहेत. याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील औषध दूकाने आणि बोगस डॉक्टरांचा शोध घेवून कार्यवाही करावी. तसेच अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. ग्रामीण भागातील आठवडी बाजारात विक्रेते दगडाचे माप वापरतात, अशा विक्रेत्यांची तपासणी करुन वैधमापन विभागाने कारवाई करावी. परतुर येथील राशन दुकानामधुन मानकांप्रमाणे धान्य वितरीत होत नसल्याने अशा दूकानांची तपासणी करावी. जिल्ह्यातील रस्त्यांवरील दूभाजक अनाधिकृतपणे तोडण्यात आलेले आहेत. त्याचा शोध घेवून योग्य कार्यवाही करावी. शहरातील विविध रस्त्यावरील सिग्नलच्या वेळा रस्यांतरवर होणाऱ्या वाहनांची वाहतूकीचे अभ्यास करुन योग्य कार्यवाही करावी. रस्यांाणवरील दूभाजकांवर विविध प्रकारचे फलक लावल्याने अपघात होण्याची शक्यता असते, अशा फलकांबाबतीत कार्यवाही करावी. जालना येथील न्यू मार्केट यार्ड समोरील रस्त्यावर गतिरोधकाची आवश्यकता आहे का ? याची पाहणी करुन परिवहन कार्यालयाने आवश्य ती कार्यवाही करावी. तसेच वेळोवेळी टॅक्स भरुन ही जालना मार्केट कमिटी परिसरातील स्वच्छता होत नाही. मार्केट यार्ड महावितरणने स्मार्ट मिटर संबंधी प्राप्त तक्रारीचे निवारण करावे. बदनापुर वाहन थांब्याजवळ विद्युत पोल लावले ते तपासुन घेणे. तसेच ग्राहकांनी महावितरण संबंधधी तक्रारी 1912 आणि 18002123435 यावर नोंदवावी. तसेच आजच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीस प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव मनिषा देशपांडे यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्ह्याच्या ऑनाईलन पोर्टलवर मागील महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगुन, तक्रारी ऑनलाइन नोंदवाव्यात. तसेच jalna.nic.in या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले.

No comments:
Post a Comment