Thursday, 22 January 2026

स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी राबवा - श्रीमती आशिमा मित्तल • कुष्ठरुग्णांना सन्मानने वागणुक देण्याचे आवाहन

 



जालना, दि.22 (जिमाका) : स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान  दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत सुक्ष्म नियोजन करुन प्रभावीपणे राबविण्यांच्या स्पष्ट सुचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाती आयोजित जिल्हा समन्वय समिती बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.राजेंद्र पाटील जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.जी.डी.म्हस्के सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.जी.एम.कुडलीकर जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ.रघुवीर चंदेल माता बाल संगोपन अधिकारी, डॉ.अतुल राजे आरोग्य वैद्यकिय अधिकारी मनपा जालना, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक, अधिकारी वर्ग व सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालय येथील कर्मचारी उपस्थित होते.

श्रीमती मित्तल म्हणाल्या की, या अभियान अंतर्गत दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर शासकीय कार्यालय व सरपंच यांनी ग्रामसभा घेऊन कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन करुन प्रतिज्ञा घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच ‘भेदभाव समाप्त करु या, सन्मानाची वागणुक देऊ या’ या घोषवाक्याची अमंलबजावणी करण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवाडा साजरा करतांना शाळा/महाविद्यालयामध्ये कुष्ठरोगाच्या प्रतिज्ञाचे वाचन करुन कुष्ठरोग विषयी औषधोपचार  व आजाराबाबत गैरसमज माहिती द्यावी.

आरोग्य सेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ.सुधाकर शेळके यांनी दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अंतर्गत  विट भट्टी, आश्रमशाळा, बांधकाम मजुर, कंपनीतील कामगार, कारागृहातील कैदी, झोपडपट्टी, स्थलांतरीत झालेला भागाचा प्रमुख्याने लक्ष केंद्रीत करुन सर्व्हेक्षण करण्यांत येणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व्हे टीममध्ये एक आशा व एक पुरुष कर्मचारी किंवा स्वयंसेवक असणार आहे. तसेच कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांना (सहवासिंतांना) रिफॅम्पिसीन या गोळीचा एक डोस देऊन संसर्गापासुन सुरक्षित करण्यांत येणार आहे. तसेच जालना यांनी कुष्ठरोगाची जालना जिल्हयातील कुष्ठरोगाची सद्यस्थिती व कुष्ठरोगाबाबत सविस्तर माहिती दिली. 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment