जालना, दि.19
(जिमाका) : जेईई मेन 2026 परीक्षा दि. 21 जानेवारी 2026 ते 29
जानेवारी 2026 या कालावधीत सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत जिल्ह्यातील जेईएस कॉलेज, इंस्टीट्युट ऑफ
फार्मसी पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर या दोन
परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
वरील परीक्षा केंद्राचे परिसरात अशांतता निर्माण
होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याता शक्यता असल्याने वरील परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागु
केले आहे.
परीक्षा कालावधीत या दोन परीक्षा केंद्राच्या 200
मीटर परिसरात सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ/फॅक्स/झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवावेत असा कलम 163
(2) नुसार एकतर्फी आदेश काढण्यात आले आहेत.
वरील आदेश दि. 21 जानेवारी 2026 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासुन ते दि. 29 जानेवारी 2026
रोजीच्या सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत अंमलात राहतील.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment