जालना, दि.14 (जिमाका) :
नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी होणाऱ्या 'हिंद-की-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350
व्या शहीदी समागम वर्षानिमित्त अंबड नगर परिषदेत आज मुख्याधिकारी मनोज उकीरडे
यांच्या अध्यक्षेत बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी यांनी 'हिंद की
चादर' कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार चर्चा करुन
नांदेड येथील कार्यक्रमासाठी अंबड शहरामार्फत तसेच प्रशासनामार्फत कोणत्या सेवा
देता येईल याबाबतचे नियोजनासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीस नगर
परिषद प्रशासनातील अधिकारी यांच्यासह विविध समाजातील प्रतिनीधी यांची उपस्थिती
होती.
-*-*-*-*-*-*-

No comments:
Post a Comment