जालना दि. 30 (जिमाका) :- जालना जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य सेवक (पुरुष) 40% व 50% या कोट्यातील सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने भरती प्रकियेची पारदर्शक इन कॅमेरा प्रसारमाध्यमांसमोर तक्रारदाराच्या समक्ष सखोल चौकशी करण्यासाठी दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते 5 या दरम्यान कै.यशवंतराव चव्हाण सभागृह जि.प.जालना येथे तक्रार निवारण करण्यात येणार आहे. सदरील दिवशी विहित वेळेत तक्रारदारांनी, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्राच्या पुराव्यानिशी उपस्थित रहावे, असे अवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment