जालना
दि. 16 (जिमाका) :- बाल न्याय
मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 च्या
प्रस्तावनेत नमुद केल्यानुसार बालकांसोबत काम करणाऱ्या सर्वच यंत्रणा बालस्नेही असणे
गरजेचे आहे. या बाबीची अंमलबजावणी होण्यासाठी काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके
व विधी संघर्षग्रस्त बालके यांच्या सामाजिक पुर्नएकात्मिकीकरण करण्याची प्रक्रिया बाल
स्नेही वातावरणात व्हावी, या उद्देशपूर्तीकरीता पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रयत्न
करावेत, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले.
जिल्हा
महिला व बाल विकास कार्यालय आणि होप फॉर दी चिल्ड्रेन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त
विद्यमाने दि.15 जुलै 2025 रोजी
विशेष बाल पोलीस पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन 1098, बाल
कल्याण समिती, बाल न्याय मंडळ आदि सर्व यंत्रणांचे एक दिवसीय प्रशिक्षण पोलिस अधिक्षक
कार्यालयात घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक
आयुष नोपाणी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणात बाल न्याय अधिनियम 2015 नुसार
विधी संघर्षग्रस्त बालके व काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके यांच्या सोबत अनुसरावयाची
कार्यपध्दती तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण 2012 या कायद्याबाबत
प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेमधील विशेष बाल
पोलीस पथकातील अधिकारी-कर्मचारी, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बाल कल्याण समिती सदस्य,
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षातील
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षण होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशनचे व्यवस्थापक ॲङ परम
आनंद, वसीम शेख, सहाय्यक व्यवस्थापक सचिन करंजुले
यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांनी केले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment