जालना,
दि. 14 (जिमाका) : जिल्हा परिषद
व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक
विभागाची व कलम 58 (1)(अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांच्या प्रारुप प्रभाग
रचनेबाबत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी शासन आदेशाच्या मसुद्याची जिल्हाधिकारी
कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालयात फलकावर प्रसिध्द
केली आहे. आदेशाच्या मसुद्यास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण
निवेदने, हरकती, सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवार दि.21 जुलै 2025 पर्यंत सादर
करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांच्या प्रारुप
प्रभाग रचनेबाबतची माहिती जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जालना येथील
जिल्हा परिषदेतील फलकावर, तसेच भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, जालना, मंठा, परतूर, घनसावंगी
आणि अंबड येथील तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात
आली आहे. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment