Tuesday, 15 July 2025

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत

 


 

           जालना दि. 15 (जिमाका) :- भारत सरकारकडून पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती देण्यात येते. तरी सन 2025-26 वर्षामधील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदविण्यासाठी प्राचार्यांनी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करून जास्तीत जास्त अर्ज नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावेत,  असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजु एडके यांनी केले.

अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन सादर करण्यासाठी आज दि. 15 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांची सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सन 2024-25 वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी तसेच महाविद्यालय लॉगिनवर प्रलबिंत असलेले अर्ज तात्काळ पडताळणी करून पात्र अर्ज मंजुर करण्यासाठी तसेच  सन 2023-24 मधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी अभावी विद्यार्थीं लॉगिनला पाठविण्यात आलेले आहेत त्यांना त्रुटी पुर्तता करून रिॲप्लाय  करण्यासाठी दि. 31 जुलै 2025 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. अशी सुचना सर्वांना देण्यात आली.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment