जालना दि.7 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, या कार्यालयामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दि. 7 जुलै ते 15 जुलै
या कालावधीत कौशल्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 जुलै 2025 रोजी सकाळी
11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे दिव्यांग व्यक्तीसाठी विषेष
रोजगार/स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये
शासनाच्या विविध विभागामार्फत दिव्यांग व्यक्तीकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध
योजनांची माहिती तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार/स्वयंरोजगाराच्या विविध
क्षेत्रातील संधीबाबत विभागातील/महामंडळातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात
येणार आहे. तरी दिव्यांग व्यक्तींनी उपस्थित राहून सदर संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक
आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले
आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment