जालना दि. 28 (जिमाका) :- वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विदयार्थ्यांसाठी
परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडुन
अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत
2025-26 या वर्षासाठी जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आली आहे. अर्ज
सादर करण्याची अंतिम मुदत दि. 1 ऑगस्ट 2025 अशी असुन सदरील योजनेचे अर्ज आयुक्त, समाज
कल्याण, महाराष्ट्र राज्य, 03 चर्च पथ, पुणे-01 या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन
जालना समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजु एडके यांनी केले प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment