जालना दि. 1 (जिमाका) :आनंद विवाह नोंदणी अधिनियम संपुर्ण जिल्हयामध्ये
राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र विवाह
मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 व महाराष्ट्र विवाह मंडळाचे
विनियमन आणि विवाह नोंदणी 1999 नुसार राज्यात झालेल्या विवाहांची नोंदणी करुन
पक्षकारांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. विवाह
नोंदणी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या दि.23 एप्रिल 2020 च्या अधिसुचनेनुसार
महाराष्ट्र शासन आनंद विवाह नोंदणी निंबधक म्हणुन महानगरपालिका - संबंधीत प्रभाग
अधिकारी,नगरपालिका/नगर परिषद/नगर पंचायत/कटक मंडळे - संबंधीत मुख्याधिकारी यांना
प्राधिकृत करण्यात आले आहे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा स्तर) तसेच विवाह
निबंधक (महानगर पालिके मधील संबंधीत प्रभाग अधिकारी तसेच मुख्याधिकारी नगर
पालिका/नगर परिषद/नगर पंचायत/कटक मंडळे यांना कळविण्यात येते की, आनंद विवाह
नोंदणी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शीख समाजाचे विवाह हे आनंद विवाह
नोंदणी अंतर्गत नोंदविण्यासाठी या समाजाला अडचणी येणार नाहीत. शीख समाजाला विवाह नोंदणी केल्यामुळे शासकिय
कायदेशिर फायदे मिळणे सुलभ होईल.
सर्व
शीख समाजातील नागरिकांनी आनंद विवाह नोंदणी मध्ये विवाह नोंद करण्याचे आवाहन जिल्हा
परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.जयश्री भुसारे यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment