जालना, दि. 11 (जिमाका) :जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, जालना या कार्यालयामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दि. 7 जुलै ते दि.
15 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहाच्या निमित्ताने
दि.11 जुलै, 2025 रोजी सामाजिक न्याय भवन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे
दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात
आले होते. सदर मार्गदर्शन सत्रास विविध महामंडळाचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून त्यांच्याकडे
राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहितीचे सादरीकरण करून योजनेचा लाभ घेण्यासाठीची
कार्यपध्दती समजावून सांगितली. सदर सत्रास 51 उमेदवारांनी उपस्थित राहून रोजगार व स्वयंरोजगार
मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला. या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भुजंग रिठे,
यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन समुपदेशक डॉ. अमोल परिहार यांनी
केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आत्माराम दळवी, प्रदीप डोळे, रवि पाडमुख, विशाल
जगरवाल, दिपक पालवे, अमोल बोरकर यांनी परीश्रम घेतले.अशी माहिती सहायक आयुक्त, कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment