जालना,
दि. 14 (जिमाका) : जिल्हा एड्स
प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकु), जिल्हा रुग्णालयाकडून दि.11 जुलै 2025 रोजी एचआयव्ही/एड्स व सुरक्षा क्लिनिकविषयी
जनजागृतीपर संवेदीकरण कार्यशाळेचे आयोजन जिल्हा कारागृहातील बंदीसाठी करण्यात आले.
कार्यशाळेत उपस्थित सर्व बंदींना एचआयव्ही/एड्स व सुरक्षा क्लिनिकविषयी सविस्तर समुपदेशन
करण्यात येवून बंदीची एचआयव्ही तपासणीसुध्दा करण्यात आली. यावेळी उपस्थित बंदींच्या
शंकेचे निरसनही करण्यात आले. यावेळी तुरुंग
अधिकारी मुकुंद जाधव, जगदीश काकड, हरीदास कोल्हे, सुनिल घनसावंत, प्रदीप वाघ, मनिषा
जाधव, योगेश राऊत, संदीप लुखे यांच्यासह कारागृहातील बंदीची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment