जालना,
दि. 14 (जिमाका) : श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळ
वारी परंपरेनुसार सदर पालखी पंढरपुर येथून परतीच्या मार्गावर आहे. या दिंडीमध्ये जवळपास
800 वारकरी सहभागी आहेत. तरी राष्ट्रीय महामार्गावरील येणारी व जाणारी वाहतूक व्यवस्थेच्या
सुनियमनासाठी दि.19 जुलै ते 21 जुलै 2025 या कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
शनिवार दि.19 जुलै 2025 रोजी सकाळी
8 ते रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री
समोरील उड्डानपुलाखालून व बाजुने अंबडकडे
येणारी अवजड वाहने थांबवून सदरील वाहने पाचोड-अंबड मार्गे जालनाकडे जातील तर
जालनाकडून शहागडकडे जाणारी वाहने अंबड –पाचोड मार्गे जातील.
रविवार
दि.20 जुलै 2025 रोजी सकाळी 3 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डानपुलाखालून व बाजुने अंबडकडे येणारी
सर्व अवजड वाहने थांबवून पाचोड-जामखेड फाटा-जामखेड-किनगाव
चौफुली-बदनापूर मार्गे जालनाकडे जातील तसेच जालनाकडून येणारी वाहने बदनापूर-किनगाव
चौफुली-पाचोड मार्गे शहागडकडे जातील. शहापुर ते शहाकड व अंबड ते पाचोड मार्गावरील गावातील
अवजड वाहनांनी याच मार्गाचा वापर करावा तसेच पारनेर फाटा ते छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंतच्या
गावातील अवजड वाहनांनी याच मार्गाचा वापर करावा.
सोमवार दि.21 जुलै 2025 रोजी सकाळी
3 ते रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डानपुलाखालून व बाजुने
अंबडकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करुन सदर वाहने वडीगोद्री-पाचोड-जामखेड फाटा-जामखेड-किनगाव
चौफुली-बदनापूर मार्गे जालनाकडे जातील. तसेच जालनाकडून येणारी वाहने बदनापूर-किनगाव
चौफुली-जामखेड-जामखेड फाटा- पाचोड मार्गे शहागडकडे जातील. तसेच अंबडकडून जालनाकडे जाणारी
अवजड वाहने सकाळी 3 ते रात्री 11 वाजेदरम्यान
बंद करुन सदर वाहने किनगाव चौफुली-बदनापूर मार्गे जालनाकडे जातील. व जालनाकडून अंबडकडे
येणारी अवजड वाहने बदनापूर-किनगाव चौफुली-जामखेड-पाचोड मार्गे शहागडकडे जातील.
दि.19 जुलै ते 21 जुलै 2025 या कालावधीत
जालनाकडून घनसावंगीकडे जाणारी वाहने रोहनवाडी-सुतगिरणी मार्गे घनसावंगीकडे जातील व
घनसावंगीकडून जालनाकडे जाणारी वाहने त्याच मार्गे जालनाकडे जातील.घनसावंगीकडून बीडकडे
जाणारी वाहने तिर्थपुरी-गोंदी-शहागड मार्गे बीडकडे जातील. या प्रमाणे पर्यायी मार्गाने
वाहतुक वळविण्यात आली आहे. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी. असे असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी
जारी केले आहेत.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment