जालना दि. 30 (जिमाका) :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांच्या हस्ते जालना येथील पाठक मंगल कार्यालयाजवळील इमारतीमधील जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे बुधवार दि.30 जुलै 2025 रोजी दुपारी 2.50 वाजता उदघाटन केले. यावेळी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शाह आलम खान, जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे, घनश्याम गोयल, विष्णू चेचाणी, सुदेश सकलेचा, चेतन देसरडा, संजयकुमार लवांडे, ॲड. निखिल जैन, नरेंद्र जोगड आदिंची उपस्थिती होती.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment