जालना दि.29 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी, अपील, सेवावि
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment