Wednesday, 2 July 2025

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती वाहनावर सुधारीत कर आकारणार

 


 

    जालना दि.2 (जिमाका) :  गृह विभाग यांच्या अधिसुचनेद्वारे मोटार वाहन कर सुधारणेसाठी तरतुद केल्याप्रमाणे दि. 1 जुलै 2025 पासून वाहनावर सुधारीत कर लागु करण्यात आले आहेत. वाहनावरील सध्या लागू असलेला कर व सुधारीत कर याविषयी खाली दिल्याप्रमाणे बदलेले आहेत.

      सीएनजी किंवा एलपीजी वर चालणारी खाजगी संवर्गातील दुचाकी व चारचाकी वाहने यासाठी सध्या असलेला कर वाहनाची किंमत रुपये 10 लाखापर्यंत असेल तर सध्याचा कर 7 टक्के एवढा आहे यावर सुधारीत कर हा 8 टक्के आकारला जाईल. वाहनाची किंमत रुपये 20 लाखापर्यंत असेल तर सध्याचा कर 8 टक्के एवढा आहे यावर सुधारीत कर 9 टक्के आकारला जाईल. वाहनाची किंमत रुपये 20  लाखापेक्षा जास्त असल्यास सध्याचा कर 9 टक्के एवढा आहे यावर सुधारीत कर 10 टक्के इतका राहील.

            बॅटरीवर चालणारी मोटार वाहनासाठी जर वाहनाची किंमत 30 लाख रुपये पेक्षा अधिक असेल तर वाहनाच्या किंमतीच्या 6 टक्के इतका कर आकारला जाईल.

            क्रेन्स कॉम्प्रेसर्स, प्रोजेक्टर्स किंवा खनित्रे यासारखी बांधकामाकरीता वापरली जाणारी कोणतीही मोटार वाहने यासाठी सध्याचा कर वाहनाच्या युडब्ल्यू किंवा जीव्हीडब्ल्यू वजनावर वार्षिक कर असतो सुधारीत कर मोटार वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के एकरकमी आकारला जाईल.

ओझे लादलेले असतांना ज्यांचे नोंदणीकृत वजन 7500 किलोग्रॅम अधिक नसेल अशी माल किंवा सामग्री यांची वाहतूकीकरीता वापरली जाणारी हलकी मालवाहतूक वाहने यासाठी सध्याचा कर वाहनाच्या युडब्ल्यू किंवा जीव्हीडब्ल्यूवजनावर वार्षिक कर असतो सुधारीत कर मोटार वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के एकरकमी आकारला जाईल.

वरील सर्व कर हे दि. 1 जुलै 2025 पासून लागू होत आहे. तरी सर्व वाहन धारक, वाहतूक संघटना यांनी वरीलप्रमाणे सुधारीत कराची नोंद घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment