लना दि. 30 (जिमाका) :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि.30 जुलै 2025 रोजी पहाटे 5 वाजता जालना येथे आगमन व शासकीय विश्रामगृहा कडे रवाना. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत जैन मंदिर स्थानक दर्शनार्थ भेटीसाठी रवाना. सकाळी 11 वाजता तारा फाऊंडेशन आयोजित पुरस्कार वितरण समारोहास हॉटेल विजय विलास येथे उपस्थिती. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुखांच्या समवेत आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता भगवान महावीर निर्वाण कलयाणक निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ व जैन समाज पदाधिकारी संवाद बैठकीस नियोजन भवन सभागृहात उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता जालना येथून बुलढाणाकडे वाहनाने प्रयाण करतील.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment