जालना दि. 1 (जिमाका) : भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिन 29 जुन हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणुन साजरा करण्यात येतेा. त्या अनुषंगाने जिल्हा सांख्यिकी कार्यालयात 29 जुन रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यालयात राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रा. षाजी सहदेवन यांची उपस्थिती होती त्यांनी याप्रसंगी सांख्यिकी या विषयातील मुलभूत संकल्पना सोप्या पध्दतीने दैनंदिन व्यवहारात कशा उपयोगात आणल्या जातात यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सुचित कुलकर्णी होते.त्यांनी समारोपप्रसंगी सांख्यिकी संबंधी गौरवपुर्ण कार्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांख्यिकी सहायक मंगेश जोशी यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन अन्वेषक प्रतिक मोरे यांनी केले. अशी माहिती जिल्हा सांख्यिकी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सुचित कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment