जालना, दि.8 (जिमाका) :-
राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार दि.8 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद व
त्याअंतर्गतच्या पंचायत समिती निवडणूकासाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गण निहाय
प्राकरुप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील, पंचायत समिती,
ग्रामपंचायत कार्यालयातील सुचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या
संकेतस्थळावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
करण्यात आली आहे, तरी हरकती व सूचना संबंधित तहसील कार्यालयात विहीत मुदतीत सादर
कराव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले आहे.
राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या
पंचायत समिती निवडणूकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला
असून कार्यक्रमानूसार निवडणूक विभाग व
निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि.8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द
करण्यात आली आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दि.8 ते 14 ऑक्टोबर 2025 या
कालावधीत दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय
मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करुन दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात
येतील. तसेच मतदान केंद्राची व मतदान
केंद्रनिहाय यादी दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment