जालना, दि. 6 (जिमाका) :- जालना येथील हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अल्पमुदतीचे 7 अभ्यासक्रम दि.8 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होत आहेत. या कार्यक्रमाचा ऑनलाईन उदघाटन समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि.8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता मुंबई येथे होणार आहे.
जालना येथील आयटीआयमध्ये ब्युटी थेरिपिस्ट, टेक्निशियन एअर कंडीशनर, सोलर पॅनल इन्स्टॉलेंशन टेक्निशियन, ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन, मोबाईल रिपेअरिंग, एलईडी लाईट रिपेअरिंग, डिजीटल मित्र हे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु होत आहेत. अभ्यासक्रमासाठी इयत्ता आठवी, दहावी, आयटीआय उत्तीर्ण ही अर्हता ठेवण्यात आली आहे. असे उपप्राचार्य, हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment