जालना, दि. 10 (जिमाका) :- जिल्ह्यातील
सर्व उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठीच्या पदभरतीची लेखी परीक्षा
दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. जालना शहर
परिसरातील एकुण 24 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. तरी परीक्षा
उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात कायदा व
सुवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक
कार्यवाही म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्यात आला आहे,
असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा
संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन पोलीस पाटील भरती
लेखी परीक्षेच्या 24 उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सर्व सार्वजनिक
टेलिफोन, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र
व ध्वनी क्षेपके बंद ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाच्या अंमलबजासाठी
नोटीस देण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163
(2) नूसार आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. आदेश दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी अंमलात राहील,
असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment