वाचन प्रेरणा दिनानिमित्त
ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
जालना दि. 15 (जिमाका) :- वाचन
प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रीया आहे. ज्ञानसंपन्न
आणि माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे
आवश्यक आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा
जन्मदिवस
अर्थात वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय, जालना येथे करण्यात आले आहे.
ग्रंथप्रदर्शन
उदघाटनप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जेष्ठ वाचक व निवृत्त
मुख्याध्यापक मधुकर जोशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकुर, शंकर पवार,
गणेश हिवरे, चंद्रकांत गोमटे व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पोलिस
अधिक्षक कार्यालयासमोर, पत्रकार भवनशेजारी, जालना येथे सर्वासाठी खुले असुन जनतेने
या प्रदर्शनाचा लाभ घेऊन शासकीय ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन जालनाचे
जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकुर यांनी केले आहे.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment