जालना,दि.10 (जिमाका): राज्य
निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूकासाठी आरक्षण
सोडत कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी
11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्हा परिषद निवडणूक
विभागासाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग
(महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षण सोडत होणार असल्याचे नम्रता चाटे,
उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment