जालना, दि.30 (जिमाका) :- जिल्ह्यात
मंठा तालुक्यातील माहे जुलै व माहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व
सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने
शेतपिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले व मंठा तालुक्यातील माहे जुलै महिन्यातील
शेती पिक नुकसान अनुदान वाटप करिता दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार
याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. माहे जुलै महिन्यातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी
मंठा तालुक्यासाठी रु. 7,00,41,385/- (सात कोटी एकेचाळीस हजार तिनशे पंच्याऐंशी
रुपये) प्राप्त झालेले आहेत. तसेच माहे स्पटेंबर मधील नुकसान अनुदान वाटपासाठी
दि.२०/१०/२०२५ व २९/१०/२०२५ शासन निर्णयाद्वारे उपलब्ध झाले असुन माहे स्पटेबर
2025 मधील नुकसानग्रस्त शेतकरी याद्या अपलोड करण्याची प्रक्रीया युध्द पातळीवर
सुरु आहे. माहे सप्टेंबरच्या सततच्या पाऊसामुळे मंठा तालुक्यातील एकुण रु.
39,84,83,090/- (एकोनचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लक्ष त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये)
अनुदान लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment