जालना,
दि. 14 (जिमाका) :- सैनिक
कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेतील
लिपिक टंकलेखक (गट-क) एकुण 72 पदासाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने
अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदापैकी 01 पद हे अपंग संवर्गातून
किमान 40% अपंगत्व असलेल्या उमेदवारामधुन दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये
व जबाबदारीचा विचार करुन गुण्वत्ता/ उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया
टिसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने
स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना
वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 14 ऑक्टोबर
2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासुन दि.5 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23. 59 वाजेपर्यंत
सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर ही वेबलिंक बंद होईल. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
जालना यांच्याकडून कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment