जालना, दि. 7 (जिमाका) :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन 2025-26 अंतर्गत रब्बी हंगामासाठी पीक प्रात्यक्षिकातंर्गत जालना जिल्ह्यास मोहरी या पिकासाठी लक्षांक प्राप्त आहे. तसेच राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य, तृणधान्य, भरड धान्य तसेच व्यापारी पिक ऊस अंतर्गत ऊस हरभरा आदि घटकासाठी प्राप्त लक्षांकानूसार शेतकरी गटांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ मिळणार आहे. या घटकांसाठी अर्ज कर ण्याची प्रक्रिया पुर्णपणे ऑनलाईन असून उत्सुक शेतकरी गटांनी या संधीचा लाभ घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment