जालना, दि. 10 (जिमाका) :- महिला व बालविकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयाकडुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन
योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, एकल पालक, दुर्धर आजाराने बाधीत
पालकांची बालके, कैद्यांची मुले, दिव्यांग बालके, अंध, मतीमंद,
बालके यांना सदर योजनेअंतर्गत बाल कल्याण समितीच्या शिफारसीनुसार 2 हजार 250 रुपये
दरमहा लाभ दिला जातो. अर्जदाराने अर्ज त्रयस्थ्ा व्यक्तीमार्फत न सादर करता स्वत:
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना प्रशासकीय इमारत तळमजला जालना या
ठिकाणी सादर करावा. तसेच सदर योजनेसाठी कार्यालयाकडुन कोणतेही शुल्क आकारण्यात येत
नसुन सदर योजना मोफत पुरविण्यात येते.याबाबत कुणाची आर्थिक फसवणुक झाल्यास त्याची जबाबदारी
या कार्यालयाची राहणार नाही यांची सर्व संबंधीत लाभार्थींनी नोंद घ्यावी असे अवाहन
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment