Wednesday, 1 October 2025

बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट


 


 

जालना, दि. 1 (जिमाका) :- जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.

भारतामधील काही राज्यात बंजारा समाजाचा समावेश अनूसूचित जमातीमध्ये आहे. तरी  महाराष्ट्रातील बंजारा समाजाचाही हैद्राबाद गॅझेटियरचा आधार घेत अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने चर्चात्मक संवाद साधला. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बंजारा समुहाच्या शिष्टमंडळाशी आस्थेने व सुह्दयतेने संवाद साधत त्यांचे म्हणने ऐकुन घेतले. आपल्या मागण्या या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.धुमाळ, हरिष राठोड, श्रीकांत राठोड  यांच्यासह संबंधित शिष्टमंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment