जालना, दि. 10 (जिमाका) :- सामाजिक
न्याय व विशेष सहाय विभागाकडून संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थींचे
मासिक अर्थसहाय 1 हजार 500 रुपयांवरुन 2 हजार 500 रुपये करण्याच्या अनुषंगाने
जालना शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयातील नोटीस बोर्डवर
डकविण्यात आली आहे. दिव्यांगासाठी मंगळवार दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता
जालना तहसील कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शिबीरात ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, युडीआयडी
कार्ड, अद्यावत आधारकार्ड व बँक
पासबुकाच्या छायांकित प्रतिसह हजर रहावे, असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment