जालना, दि.24 (जिमाका): आदिवासी
विकास आयुक्तालय नाशिक या कार्यालयाच्या आदेशानुसार लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर
या जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे बाह्यस्त्रोत संस्था छत्रपती
शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व महाराष्ट्र विकास ग्रुप यांच्यामार्फत
तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे.
प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातंर्गत एकुण
8 शासकीय आश्रमशाळा असून या आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक
व माध्यमिक शिक्षक या रिक्त पदावर (कंत्राटी
पदे), पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अपर आयुक्त नाशिक व ठाणे https://scsmltd.com/ अपर आयुक्त अमरावती व नागपुर
https://mvgcompany.in
या लिंकवर अर्ज भरण्याची कार्यवाही दि. 20 ते 31 ऑक्टोबर, 2025 पर्यंत करण्याचे आवाहन
अधिक्षक आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment