जालना, दि. 27 (जिमाका) :- नोकरीच्या शोधात असलेल्या
जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय
आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार
सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्याकडून जालना येथे शुक्रवार दि.31 ऑक्टोंबर, 2025 रोजी प्लेसमेंट
ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन सकाळी 11 ते दु.2
वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
स्वतंत्र
मायक्रोफिन प्रा.लि. मुंबईचे फिल्ड ऑफिसर पदाकरिता दहावी, बारावी, आय. टी.आय. उत्तीर्णांसाठी 25 पदे, त्याच प्रमाणे दहावी, बारावी
उत्तीर्णसाठी फिल्ड प्रतिनिधीचे 25 पदे असे एकूण 50 रिक्तपदे
प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या
उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे. जालना
जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या
एन.सी.एस. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील www.ncs.gov.inया संकेतस्थळावर नोंदणी
करावी. यापूर्वी
नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिनमधून
आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील प्लेसमेंट
ड्राईव्ह-जागेवर निवड संधीया बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्राईव्ह जालना-05 याची निवड करावी किमान
दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून दि.31 ऑक्टोंबर, 2025 रोजी सकाळी
11 ते दु. 2 या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल
करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा
मजला, जालना येथे
उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या
पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक
आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment