Monday, 6 October 2025

13 ऑक्टोबरला पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यामधील राखीव ठेवावयाच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती-1 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग- 1 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- 1 जागा, सर्वसाधारण-2 जागा, आणि सर्वसाधारण महिला -3 जागा राखीव आहेत. तरी पंचायत समिती सभापती आरक्षण सोडतीसाठी सर्व ग्रामस्थांनी हजर रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment