जालना, दि.21 (जिमाका) :-
जिल्हा युवा पुरस्कारासाठी वर्ष 2020ते 2024 असे एकुण 5
वर्षासाठीच्या युवा पुरस्कारासाचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी मागविले होते.
मागील पाच वर्षाचे अर्ज कार्यालयाला प्राप्त झाले असून त्यांच्या गुणांकाचे काम
सध्या सुरु आहे. तरी जिल्हा युवा पुरस्कार दि.26 जानेवारी ऐवजी महाराष्ट्र दिनी
दि. 1 मे 2025 रोजी वितरीत करण्यात येणार आहेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment