Wednesday, 15 January 2025

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

 


जालना, दि. 15 (जिमाका) :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनअंतर्गत परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील 173/95/120 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी वितरणासाठी तीन तालुक्यात विविध पाईपलाईनची काम पूर्ण करण्यात आली आहेत. सध्या पाईपलाईनद्वारे परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातील 268 गावांना जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तरी विविध विभागामार्फत कामे करतांनी पाईपलाईनची तुट-फुट होवून या गावांना पाण्यापासून वंचित रहावे लागते तसेच ग्रामस्थांच्या रोषाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सामोरे जावे लागते. तरी तीन तालुक्यात कोठेही काम करावयाचे असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना यांना पुर्व सुचना देण्यात यावी. जेणेकरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कर्मचारी प्रत्यक्षस्थळी उपस्थित राहून पाईपलाईनची अलायमेंट दाखवून देईन आणि पाईपलाईनची नासधूस होणार नाही व काम सुकर होतील. असे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment