जालना, दि. 31 (जिमाका) :-
राज्याच्या पर्यावरण व
वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती
पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौऱ्यातील सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी यशश्री निवासस्थान परळी येथून शासकीय
वाहनाने सकाळी 10.45 जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आगमन. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा
नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल समिती
बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वाजता भाजपा जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट, दुपारी 2
वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या नवा मोंढा येथील निवासस्थानी
भेट देतील. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती संभाजीनगरकडे
प्रयाण करतील.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment