Wednesday, 15 January 2025

 

युवक-युवतींसाठी इस्राईल देशात

होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कस म्हणून रोजगाराची संधी

 

            जालना, दि. 15 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यातील 25 ते 45 वयोगटातील पात्रताधारक उमेदवारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर्स म्हणून काम करण्यास इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या लिंकवर उमेदवारांनी नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.

विविध उपक्रमापैकी एक असलेल्या इस्राईल आणि भारत यांच्यातील कराराद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करणे या अंतर्गत देशातील होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर्स यांना इस्राईल नॉन वॉर झोनमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्राईलकडून पात्रताधारक जीडीए,  एएनएम,  जीएनएम,  बीएसी नर्सिंग आणि पोस्ट बीएसी नर्सिंग 5 हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. यासाठी अधिक सहाय्य व माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना या कार्यालयाशी प्रत्यक्ष 02482-299033 या दूरध्वनीवर संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा, असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment