जालना,दि.02
(जिमाका) :- पुणे
येथील महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व महाराष्ट्र उद्योजकता विकास
केंद्र, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या
प्रवर्गातील "अमृत" संस्थेच्या लक्षीत गटातील उमेदवारांसाठी मोफत अमृत बेकरी प्रशिक्षणावर आधारीत
निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना
तांत्रिक व उद्योजकीय प्रशिक्षण छत्रपती संभाजी नगर येथे दि. 24 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2025 या अठरा
दिवसाच्या कालावधीमध्ये देण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपला प्रवेश अर्ज एमसीईडी जिल्हा कार्यालय, जालना येथे
दि. 14 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावा, अशी प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
बेकरी
उत्पादन व्याप्ती आणि महत्त्व, बेकरीमध्ये विविध व्यवसाय संधी बेकरी उत्पादनाच्या
उत्पादनासाठी विविध तंत्रे विविध बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी विशेष उपकरणे आणि साधने आवश्यक आहेत, केकचे प्रकार,
सिद्धांत आणि व्याहारिक, टी-टाईम केकचे विविध प्रकार सिद्धांत आणि व्यवहारिक एक्सप्लोर, कुकीजचे प्रकार सिद्धांत आणि
व्यवहारिक, पफ पेस्ट्रीजचे प्रकार सिद्धांत
आणि व्याहारिक, ब्रेंड, टोस्ट, पाव, पिझ्झा, बर्गर, बन इत्यादी तयार करणे सिद्धांत
आणि व्यवहारिक, चॉकलेटचे सिद्धांत
आणि व्याहारिक, प्रशिक्षणाच्या
माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योग करण्याची संधी या प्रशिक्षणाद्वारे
उपलब्ध होणार असून प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींची निवड प्रत्यक्ष
मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सदरील प्रशिक्षणासाठी
उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
सदरील प्रशिक्षण हे खुल्या प्रवर्गातील
"अमृत" लक्षित गटातील उमेदवारांसाठी म्हणजे (ब्राह्मण, बनिया, वत्स, कम्मा, कायस्त, नायर, एयांगर, पाटीदार, बंगाली, पटेल, मारवाडी, यलमार, त्यागी, ठाकूर, मारवाडी, सेनगुनथर, सिंधी, राजपुरोहित, नायडू, यलमार,) इत्यादी प्रवर्गातील लाभार्थींना
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष मुलाखती द्वारे सहभागी होता येईल.
प्रवेशासाठी पात्रता शिक्षण किमान 12 वी पास, पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असून वयोमर्यादा 21 ते 50 वर्ष
आहे. जालना जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांना
प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे
आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, तहसीलचे अधिवास प्रमाणपत्र, जातीचा उल्लेख असलेल्या कोणत्याही
शासकीय कागदपत्राचा पुरावा, कुटुंबाचे
वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याचे तहसील
उत्पन्न दाखला, विवाहित
असल्यास महिलांसाठी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड प्रवेश
अर्जासोबत छायांकित प्रतिमध्ये जोडणे आवश्यक आहे. www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर आपला अर्ज अपलोड करून, अर्जाची हार्ड कॉपी व अर्जासोबत
आवश्यक कागदपत्राची छयांकित प्रत जोडून जिल्ह्यातील जिल्हा प्रकल्प अधिकारी या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज सादर
करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये सादर करण्याची अंतिम दि. 14 जानेवारी असून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या
लाभार्थींसाठी दि. 14
जानेवारी 2025 रोजी एमसीईडी जिल्हा कार्यालय येथे निशुल्क एक दिवसीय परिचय
कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी), द्वारा मराठा पार्क बिल्डींग विशाल
कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना दुरध्वनी क्र. 02482 220592 या ठिकाणी
संपर्क साधावा व आपला प्रवेश अर्ज सादर करावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले
आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment