Tuesday, 28 January 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी संयुक्त पुर्व परीक्षेचे आयोजन

 

 

           जालना, दि. 28 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा रविवार दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी  सकाळी 11 ते 12 या वेळेत जालना येथील विविध 9 परीक्षा उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षेसाठी  जालना जिल्हा केंद्रावर एकुण 2 हजार 767 उमेदवारांसाठी एकुण 3 समन्वय पथक, एक भरारी पथक, 9 उपकेंद्र प्रमुख,  38 पर्यवेक्षक, 134 समवेक्षक, 18 सहायक, 9 केअर टेकर व 69 वर्ग-4चे कर्मचारी असे एकुण 281 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मस्तगड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्यात आले आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment