जालना, दि.22
(जिमाका):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दि.30 जानेवारीच्या पुण्यतिथीनिमित्त
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत
केंद्र शासनाने निर्देश जारी केले आहेत. ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती
अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यात दि.30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवेचे
सहाय्यक संचालक डॉ.सुधाकर शेळके यांनी दिली आहे.
‘स्पर्श’
कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यात दि.26 जानेवारी रोजीच्या
ग्रामसभेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कुष्ठरोग विषयक
संदेश देण्यात येवून जनजागृतीपर अभियानाच्या माहितीसह जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण
पांचाळ यांच्या कुष्ठरोगाबाबतच्या आवाहनाचे वाचनही केली जाणार आहे. ग्रामसभेतच
कुष्ठरोग उपचारासंबंधी माहिती देवून उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी
आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात मोफत मिळतात याचा संदेश दिला जाणार आहे. कुष्ठरोग
पंधरवाड्यात शाळेतील प्रार्थनेनंतर कुष्ठरोगाबाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन करण्यात
येणार आहे. सर्व शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबत संदेश देण्यात येणार आहे. शाळेमध्ये
चावडीनाटक, प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, रांगोळी
स्पर्धा, कटपुथली, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य व कुष्ठरोगावरील म्हणी व घोषवाक्य स्पर्धा
आदि कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच
कुष्ठरोग मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. स्थानिक महिला मंडळ,
बचतगट, तरुण मंडळ यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांच्या
कार्यशाळा तसेच बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे.
याप्रमाणे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment