Tuesday, 7 January 2025

राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन

 


 

जालना, दि.07 (जिमाका) : जालना येथील हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपास आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांकडून स्वयंरोजगाराबाबत आणि नेतृत्व विकासावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment