जालना, दि. 28 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जालना एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने येथे बुधवार दि. 29 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जालना येथील जे.ई.एस, महाविद्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आय.टी.आय., बी.ए., बी.कॉम, बी.एससी., एम.कॉम, डिप्लोमा, डिप्लोमाॲग्री, बी.एससी. ॲग्री,एम.एस.सी. ॲग्री, एम.बी.ए, इत्यादी पात्रताधारक नोकरीस इच्छूक उमेदवारांसाठी एकूण 225 रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 14 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत
या रोजगार मेळाव्यामध्ये एस.आर.जे. स्ट्रीप्स अँड पाइप फुडस, प्रा.लि. जालना यांची 16 पदे, कृषिधन सिड्स , प्रा. लि. जालना यांची 42 पदे , आई इन्शुरन्स & इन्व्हेस्ट्मेंट जालना यांची 21 पदे, मोदी पाईप्स प्रा. लि. जालना यांची 8 पदे, प्रीम सोल्यूशन प्रा. लि. (सलाम किसान) जालना यांची 50 पदे, विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि.,जालना यांची 20 पदे, देवअश्व होंडा शोरूम यांची 14 पदे. स्पंदना स्फुर्ती फायनान्सियल प्रोसेसर प्रा. लि. जालना यांची 55 पदे,मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेटर प्रा.लि. जालना यांची 10 पदे, भुवन हुन्दाई जालना यांची 6 पदे एकूण 241 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी या 10 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती निवड व भरती करणार आहेत.
रोजगार इच्छुक जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझ्युम/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉबफेअर टॅबवर क्लिक करुन पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी क्र. 02482-299033 वर संपर्क करावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment